शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.०२ मार्च ) :- “मराठी भाषा दिन” दापोडी जुनी सांगवी शाखेच्या वतिने उत्साहात साजरी झाली.मराठी भाषा दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिम्मित मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी मराठी भाषेला प्रतिसाद म्हणून तमाम दापोडीकरांनी व सांगवीकारांनी यात सहभाग घेऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, चंद्रकांत दानवले, रुपेश पटेकर, विशाल मानकरी, दत्ता देवतारासे, सुशांत साळवी राजू भालेराव श्रद्धा देशमुख हे प्रमुख पाहुणे होते. या उपक्रमात दापोडी,सांगवी परिसरातील सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन मनसेचे पदाधिकारी उपविभाग प्रमुख अलेक्सझांडर आप्पा मोझेस वॉर्ड अध्यक्ष सागर भोकरे ,दिलीप ठोंबरे, अनिल गायकवाड, गणेश काटे उप विभाग अध्यक्ष मंगेश भालेकर,सुरेश सकट,शाखा अध्यक्ष साईराज भोसले , सचिव निखिल कदम अनेक पदाधिकाऱ्यांनी मराठीत सह्या करून घेतल्या. मराठीचा अभिमान बाळगला. मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दापोडी सांगवी परिसरात मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यात नागरिकांनीही मोठा सहभाग घेतला होता.