शबनम न्यूज : आळंदी (दि.०३ मार्च) :- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, डुडुळगाव या ठिकाणी १२ वी कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत,दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी स्नेहा नागरगोजे व द्वारका गायकवाड या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कला आणि वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थ्यांचा आणि सर्व विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. सुरेंद्र पवार – परीक्षा विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळातील घ्यावयाची काळजी तसेच परीक्षेचे नियम याबाबत सविस्तर विवेचन करून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या कोण कोणत्या संधी आहेत याबाबत सविस्तर मांडणी करून आपली महत्वकांक्षा व इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ यशस्वी होऊ शकतो याबाबत विविध उदाहरणे देत मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी मा. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. या वेळी प्रा. रेखा सुतार, प्रा. विमल गायकवाड, प्रा. माणिक कसाब, प्रा. दिलीप बारी, प्रा. विकास दिघे, प्रा प्रिती चोरडे, प्रा.हिमानी पडळसेकर, श्री. युवराज हातागळे, प्रा. प्रविण डोळस आणि श्री.गणेश खंदारे इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कला आणि वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सीमा साळुंखे यांनी केले तर सूत्रसंचालन कु. श्वेता निगळे हिने केले आणि उपस्थितांचे आभार प्रा.मिरा केसकर यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.