वृत्तसंस्था
महानगरपालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय होणार ?
शबनम न्यूज : नवी दिल्ली (दि.०३ मार्च) :- ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निर्देशापर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाहीये.
याबाबत मागासवर्ग आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्याचे समोर आले आहे. या अहवालामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारला निर्णय घेता येणार नाही. ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होणार नाहीत. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका निवडणूक होणार ? अशी परिस्थिती निर्माण झालीये.
Supreme Court directs Maharashtra govt and State Election Commission not to act upon the interim report of Maharashtra State Backward Class Commission which recommended a grant of 27% OBC quota in local bodies election & says local bodies elections be held without OBC reservation pic.twitter.com/n6HFsp1wHA
— ANI (@ANI) March 3, 2022
Advertisement