शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ मार्च) :- मोहन नगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या दर्जाची तांत्रिक तपासणी केली त्याच रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले अखेरीस ठेकेदाराला ८ लाख ३ हजार पाचशे ६७ रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. अशी माहिती माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पत्रकार परिषद दिली.
माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी गुरुवारी (दि.३) पत्रकार परिषद घेत रस्ता कॉंक्रिटीकरण कामातील अनियमितचे पुरावे सादर केले. यावेळी मारुती भापकर म्हणाले कि, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोहन नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल दरम्यान विकास आराखड्यातील एक कि.मी. रस्त्याचे कृती करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी १४ कोटी ८५ लाख ८४ हजार रुपयांचे कंत्राट मे. इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी देण्यात आले या कामाची मुदत २४ महिने म्हणजे १६-७-२०२१ रोजी संपुष्टात आली मात्र मुदत संपूनही अजूनही रस्त्याचे काम सुरू आहे. या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. किरकोळ अपघात बरोबरच वाहतूक कोंडी, ध्वनी वायू प्रदूषण, वीज व पाणीपुरवठा खंडित होणे, वीज वाहिन्या तुटणे, किरकोळ अपघात यामुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.
ते पुढे म्हणाले कि, अखेरीस ३० ऑगस्ट २०२१ रोजी सिमेंट काँक्रिटच्या या रस्ते कामातील अनियमितता दर्जाबाबत नऊ मुद्द्यांची लेखी तक्रार आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गाऱ्हाणे मांडण्यात आले. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी दक्षता व नियंत्रण कक्षाकडे तक्रारीची खातरजमा करण्यास सांगितले वारंवार पाठपुराव्यामुळे दक्षता व नियंत्रण कक्ष अधिकारी कार्यकारी अधिकारी प्रकल्प सल्लागार ठेकेदार प्रतिनिधी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली त्याच ठेकेदाराला वाचवण्यासाठी हे सर्वजण संगणमत करत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पुन्हा दाद मागण्यात आली आहे. त्यांच्या आदेशानुसार डिसेंबर रोजी पुन्हा स्थळ पाहणी केली. त्या वेळी तक्रार म्हणून सर्व तांत्रिक त्रुटी दोष मी त्यांना दाखवून दिले. त्याचे छायाचित्रण व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. तर ते स्थळ पाहणी अहवाल तयार करून संबंधित यांची स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यामुळे यातील काही वस्तुस्थिती दक्षता व नियंत्रण समितीला सामोरे ठेवावीच लागली. दक्षता व नियंत्रण कक्षाने आपल्या शिफारशी प्रभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कळविल्यास त्यानुसार कार्यकारी अभियंत्यांनी ८ लाख ३ हजार ५६७ रुपये ठेकेदाराच्या बिलातून वसूल करण्याचे आदेश दिले. यामध्ये पीक्यूसी ३०० एमएम जाडी हवी असताना ती २०० एमएम काही ठिकाणी मिळून आली, काही ठिकाणी २७० एमएम तर काही ठिकाणी २८० एमएम मिळून आली तर पी.एल.सी व जी.एस.बी मध्ये त्रुटी आहेत. महापालिकेने केलेली ही कारवाई फुसकी असून धूळफेक करणारी आहे. हि कारवाई किरकोळ स्वरूपाची असून ठेकेदाराला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. आपण केलेल्या तक्रारीतील ९ मुद्द्यांपैकी केवळ एकाच मुद्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे तथापि या कारवाईबाबत मी बिलकुल समाधानी नाही. काँक्रिट करण्याच्या कामात गुणवत्ता ढासळली असून या प्रकरणाची आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली तटस्थ तज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमून सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी. असे हि यावेळी मारुती भापकर यांनी सांगितले.
मोहन नगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या दर्जाची तांत्रिक तपासणी केली त्याच रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्याचे उघड झाले अखेरीस ठेकेदाराला ८ लाख ३ हजार पाचशे ६७ रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. अशी माहिती माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पत्रकार परिषद दिली.