शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जावेद बाबा शेख यांच्या वाढदिवसानिमित्त थेरगाव परिसरातील नागरिकांसाठी त्यांच्या पत्नी नगमा जावेद शेख यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले.
स्वर्गीय जावेद बाबा शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे थेरगाव येथील रुग्णालयात गरजू रुग्णांना फळ वाटप करण्यात आले , तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने थेरगाव परिसरातील गरजू नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले.
स्वर्गीय जावेद बाबा शेख यांचे कोरोना काळात २०२० मध्ये दुःखद निधन झाले होते. थेरगाव परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अन्नदान असे अनेक उपक्रम त्यांनी कोरोना काळात जावेद शेख यांनी राबविले होते , या काळातच त्यांचे संपर्क जास्त नागरिकांशी आल्याने ते हि कोरोना बाधित झाले. या कोरोना आजाराचा उपचार सुरू असतानाच स्वर्गीय जावेद शेख यांचे दुःखद निधन झाले, त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात अनेक गरजू नागरिकांना मदत केली, सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसर असायचे त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पत्नी नगमा जावेद शेख यांच्या वतीने सदर चे उपक्रम राबविण्यात आले.
स्वर्गीय जावेद शेख यांच्या नंतर त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी नगमा जावेद शेख यांच्या वतीने चालविला जात आहे, नगमा जावेद शेख यांनी आतापर्यंत अनेक महिलांचे संघटन केले असून अनेक महिला बचत गट स्थापन केले आहे या महिला बचत गट स्थापनेमागचा उद्देश त्यांनी या मागेच स्पष्ट केला होता महिलांचे सक्षमीकरण हे मुख्य उद्देश असून घरातील महिलांना समाजात मुख्य प्रवाहात आणून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करायचा संकल्प नगमा जावेद शेख यांनी केला आहे.
स्वर्गीय जावेद शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्त नागमा जावेद शेख यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या सामाजिक उपक्रमांचे अनेक स्तरातून कौतुक होत असून यानिमित्ताने अनेक शहरातील नेत्यांनी त्यांच्या या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या परिसरातील आजी-माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.