शबनम न्यूज : पुणे (दि.०७ मार्च) :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मोबाईलमधून तिकीट काढून मेट्रोने प्रवास केला. गरवारे कॉलेज ते आनंदनगर पर्यंतच्या प्रवासात त्यांनी दिव्यांग मुलांशी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सोबतही संवाद साधला. या प्रवास दरम्यान मेट्रोत उपस्थित असलेल्या मुलांनी शालेय गणवेश परिधान केला होता. या मुलांच्या गणवेशासोबत असलेल्या मोदींच्या फोटोवर महाराष्ट्र काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.
या प्रवासात ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश परिधान केला आहे. त्यावर रविवार असतानाही ही मुले शालेय गणवेशात का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून टीकाही केली जात आहे. त्यांच्या याच प्रसिद्धी साठी केलेल्या कृतीवर जोरदार टीका होत आहे. तसेच त्यांच्यावर मीम्स देखील व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत म्हटलंय की, रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं) तुमच्या प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात? #महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा असा हॅशटॅगही जोडण्यात आला आहे.
रविवारी शाळेला सुट्टी असते ओ मोदी साहेब (कधी शाळेत गेले असते तर माहीत असतं)
तुमच्या प्रसिद्धी साठी पोरांना कशाला त्रास देत आहात?#महाराष्ट्रद्रोही_मोदी_परत_जा pic.twitter.com/sksMUI3yOB— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 6, 2022
Advertisement
Advertisement