नगरसेवक राजू बनसोडे यांची संकल्पना
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- दापोडी येथील सी.एम.ई गेट समोरील ग्रेडसेपटरला अनेक वर्षापासून नाव दिले नाही मागील ३ वर्षापासून ग्रेडसेपटरला संत शिरोमणी रोहिदास महाराज व भारतरत्न डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम या नावाची मागणी नगरसेवक राजू बनसोडे यांच्या वतीने करण्यात आली. या नावांचा ठराव करण्यात आला.
ग्रेडसेपटर लष्कराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यास सैन्यातील शहिदांचे नाव द्यावे असे ठरावात टिपणी केली. त्यानुसार नगरसेवक राजू बनसोडे यांच्या संकल्पनेतून नुकत्याच हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेले चिफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांचे नावाचा ठराव प्रभागासह महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
त्यासाठी बी.आर.टी. विभागातील सहशहर अभियंता श्रीकांत सवणे,उपअभियंता चंद्रशेखर धानोरकर,कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, कनिष्ठ अभियंता संतोष कुदळे यांनी ठरावाची अंमलबजावणी करत आज दापोडी येथील ग्रेडसेपरेटरला चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत नाव लावण्यात आले.