जागर स्त्री शक्तीचा..सन्मान नवदुर्गाचा
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०८ मार्च) :- जागतिक महिला दिनानिमित्त अनिकेत काटे, स्विकृत सदस्य, पिंपरी चिंचवड मनपा यांच्या वतीने दिनांक ८ मार्च रोजी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यात आशा वर्कर्सच्या जवळपास १५ रणरागिणी की ज्यांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली. अशा मायमाऊलीची त्याच्या जीवाची काळजी म्हणून त्यांचा ७५०००/- रुपयांचा मेडीक्लेम करून अनिकेत काटे यांनी त्यांना “पॉलिसीपेपर व दुर्गा पुरस्कार २०२२” देऊन त्यांना सन्मानित केले.
त्याचप्रमाणे अनिकेत काटे यांच्या महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळेतील जवळपास २०० प्रशिक्षणार्थीनांही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच दापोडी-फुगेवाडी मधील भजनी मंडळाचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे एक छोटीशी अतिशय हुशार अशी कु.आफ्रिन अफजल खान हिने अगदी ९ वर्षाची असताना सुटे पार्ट जोडून संगणक तयार केला, तिच्या ह्या कौतुकास्पद कृतीबद्दल तिला ५०००/- रुपयांचा धनादेश अनिकेत काटे यांच्याकडून देण्यात आला.