शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ मार्च) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे काळेवाडी फाटा चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. सदर चौकातील नामफलकाची दुरावस्था झाली आहे.
सदरील गोष्ट लक्षात घेता फलकाची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे, तरी आपण त्वरित फलकाची दुरुस्ती करावी तसेच सदर नामफलक सुशोभीकरण करून चौकाच्या मध्यभागी म्हणजे दर्शनी भागात बसवण्यात यावा.असे निवेदन आज महापालिका आयुक्त डॉ. राजेश पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा व नावाचा वापर निवडणूक आल्यावर मत मिळवण्यासाठी करायचा आणि सत्ता आली की महापुरुषांच्या पराक्रमाचा विसर जाणीवपूर्वक पाडायचा भाजप प्रशासनाचा या पद्धतीचा पुतना मावशीचा प्रेम सबंध महाराष्ट्राला अवगत आहे, मग ते भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम पासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पर्यंत ही परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे. आता याचे अनुकरण पिंपरी चिंचवड महापालिका करत असल्याचे या नामफलक दुरुस्तीच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामुळे शहरातील शिवभक्त यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणूकीत पिंपरी चिंचवड मधील शिवभक्त जनता नक्कीच यांना त्यांची योग्य जागा दाखवतील असे इम्रान शेख म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष अमोल रावळकर,उपाध्यक्ष दिनेश पटेल,मुख्य संघटक शादाब खान, मुवाज मुजावर हे उपस्थित होते.