शबनम न्यूज : पुणे (दि.१० मार्च) :- शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व वेगवान वाहतूकसाठी नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपुल रविवार पासून प्रवासासाठी खुला होणार आहे. शहातील वाहतुकीला यामुळे वेग येणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पूल महापालिकेच्या ताब्यात देण्यात आला असून पुलाच्या विद्युत व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या उड्डाण पुलाचे उदघाटन विरोधी पक्षनेता देंवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.या दुमजली पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पहिलाच दुमजली उड्डाणपूल
महापालिकेच्या सन 2017-18 अंदाजपत्रकात दुमजली उड्डाणपुलाची संकल्पना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष आणि विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जयपूर येथील दुमजली उड्डाणपुलाच्या धर्तीवर शहरात उभारण्यात आलेला हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल आहे.
नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला होणार !
Advertisementपश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता विरोधीपक्ष नेते श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या शुभहस्ते
(१/२) pic.twitter.com/2h2Dxjxh84
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 9, 2022
Advertisement