प्रोजेक्टपुर्ण होईपर्यंत या मैदानावर मुले खेळताना दिसत नाही तोपर्यंत माझे येथे लक्ष राहील असा केला निर्धार
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० मार्च) :- १९९५ सालच्या नवीन डीपी प्लॅन मध्ये प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर भोसरी मधील सर्वे नंबर २०६ आरक्षण क्रमांक ४०० मनपा प्राथमिक शाळेसाठी आरक्षित झाले.
२०१७ ला नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर २०२०ला शिक्षण समिती सदस्यपदी प्रियांका बारसे यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या माध्यमातून प्रियांका बारसे यांनी हे शिक्षणाचे पुण्यकर्म पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली.
गवळीनगर प्रभागातील व प्रभागाच्या आजूबाजूच्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुसज्ज प्रशस्त शाळा बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
खरं तर २०१८ पासून या कामाचा पाठपुरावा त्यांनी सुरू केला होता. आणि अखेर या कामाला लेखी स्वरूपात मनपा शाळा इमारत बांधण्यास आवश्यक ती परवानगी ची कार्यवाही पूर्ण झाली .जानेवारी २०२२ मध्ये या कामाची वर्कऑर्डर निघाली पण तरीही या कामाला म्हणावी तेवढी गती मिळताना दिसत नव्हती.
नगरसेविका प्रियांका बारसे यांनी या कामाचा पाठपुरावा करून या कामाच्या वर्कऑर्डर नंतर भूमिपूजन करण्याचे ठरवले त्या संदर्भात त्यांनी माननीय आयुक्त यांना भूमिपूजन लवकरात लवकर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता पण तरीही कामाच्या गतीत फरक न दिसल्याने नगरसेविका प्रियांका बारसे यांनी १३ मार्च २०२२ पूर्वी प्रशासकाच्या हाती कारभार जाण्यापूर्वी भूमिपूजन करण्याचे ठरवले.
त्यासाठी जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहूर्त शिवाय शुभमुहूर्त त्यांना दिसला नाही आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून जागतिक महिला दिनी प्रभागातील दहा महिला प्रतिनिधी- नागरिक बरोबर घेऊन त्यांनी प्राथमिक शाळा आरक्षणाचे भूमिपूजन केले.
भूमिपूजन करताना सर्व मान्यवरांची-नगरसेवकांची उपस्थिती जर या उपक्रमाला लाभली असती आणि सर्वांचा हातभार या भूमिपूजनाला लागला असता तर निश्चितच आनंद झाला असता असे अशी भावना व्यक्त करुन श्री गणरायाच्या ईच्छेनुसार मी या भूमिपूजन करून भूमिपूजनाचा मान मिळत आहे अशी आनंदाची भावना अभिमानाची भावना या ठिकाणी व्यक्त केली.
आणि हा प्रोजेक्टपुर्ण होईपर्यंत या मैदानावर मुले खेळताना दिसत नाही तोपर्यंत माझे येथे लक्ष राहील असा निर्धार केला.
७०गुंठ्यात नव्याने बांधल्या जाणाऱ्या शाळेत ४२ प्रशस्त वर्ग ,संगणक लॅब ,ई लर्निंगची सोय स्वच्छतागृह स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय सांस्कृतिक हॉल प्रशस्त मैदान पार्किंग या सर्व बाबींचा समावेश असणार आहे येथे मराठी सेमी इंग्रजी पूर्ण इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून शिक्षण देण्याची सोय करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. पुढील पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचा नगरसेविका प्रियांका बारसे यांचा विचार आहे.