शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० मार्च) :- गुरुवारी दि.१० रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच पुन्हा एकदा राज साहेब पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येणार असे त्यांनी स्वतः सांगितले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर परिसरात मोठमोठे होर्डिग व ध्वज लावण्यात आले होते. ढोल ताश्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले., महिला सेनेच्या वतीने त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, विद्यार्थी सेनेच्या वतीने गदा देण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित माजी आमदार नितीन सरदेसाई, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाबू उर्फ राजेंद्र वागस्कर, महाराष्ट्र राज्याचे नेते अनिल शिदोरे,किशोरजी शिंदे, गणेश आप्पा सातपुते,रंजीतदादा शिरोळे, हेमंत जी संभोस, प्रशांतजी कनोजिया ,पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, पिंपरी-चिंचवड शहरातील उपशहर अध्यक्ष विशाल मानकरी, राजू सावळे, बाळा दानवले, विभागातील अंकुश तापकीर दत्ता देवतरासे, मयूर दादा चिंचवडे, जनहित कक्षाच्या अध्यक्ष राजू भालेराव, परदेसी, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर,स्नेहल बांगर,अनिता पांचाळ, संगीता देशमुख, सुजाता काटे विद्यार्थी सेना हेमंत डांगे ,अनिकेत प्रभु , प्रतिक शिंदे व सर्व शहरातील सर्व मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.