शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० मार्च) :- जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होत असताना, पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेच्या साधनाताई नेताजी काशीद यांच्या वतीनेही पिंपरी-चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त प्रमुख अतिथी शिवसेना महिला आघाडी संपर्क संघटिका पिंपरी-चिंचवड – वैशालीताई सुर्यवंशी, संपर्क प्रमुख संगमनेर सुरेखाताई गव्हाणे तसेच प्रभागातील सर्व महिला डॉक्टर, वर्ग, शिक्षिका कर्मचारी वर्ग, सफाई कामगार,व्यवसायिका तसेच इतर सर्व क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
डॉ. मंजुषा दिलपाक(सुश्रुत क्लिनिक) , डॉ. मनिषा भटृ़ , डॉ. नुतन वाघ(वाघ हाॅस्पिटल), श्रीम.एस.डी.गणगे प्रशाला कृष्णानगर येथील शिक्षिका, जगताप प्रतिभा प्रमोद, गिरी भाग्यश्री पांडुरंग तिकिटे एस.एस. , एस.एच. एन. एम.स्कुल मधील,सौ. मिनाक्षी भरत वाडेकर, (किर्तनकार ) – ह.भ.प. जाधवताई , सफाई कामगार वर्ग व सुपरवायजर जयश्री महाजन वडापाव स्टॉल चालवणारी व भाजीपाला विकणारे महिला तसेच छोटा मोठा घरगुती व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.