शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पुनावळे परिसरात भारतीय जनता पार्टीचे नवनाथ ढवळे व लॅब तज्ञ गोळविलकर मेट्रोपॉलिस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात प्रामुख्याने हिमोग्लोबिन, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल इत्यादींची चाचणी विनामूल्य करण्यात आली. या शिबिरास परिसरातील दोनशे महिलांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन कृषिनिष्ठ पुरस्कार विजेते सुनील ढवळे व भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष नवनाथ ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरास कामगार नेते सुरेश रानवडे , भरत काटे, मल्हारी गोरगले, रोहिदास बोरगे, सुभाष कोयते, दिपक आरसुडे, तसेच पुनावळे मधील ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य उपस्थित होते. या शिबिरास अनेक तज्ञ डॉक्टर यांचे मार्गदर्शन लाभले, शिबिराच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी आपल्या आरोग्याच्या चाचण्या करून घेतल्या व शिबिर आयोजित केल्याबद्दल श्री नवनाथ ढवळे यांचे आभार व्यक्त केले.