सहभागी होण्यासाठी नागरिकांनी खालीलपैकी कोणत्याही एका पध्दतीचे वापर करा
सकारात्मक उत्तरे/ अभिप्राय देवुन प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर होण्यासाठी सहकार्य करावे
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१४ मार्च) :- स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्यास लोकांना उदयुक्त करणे, समाजातील सर्व नागरिकांमध्ये जागृती निर्माण करुन स्वच्छ भारत अभियानाच्या चळवळीत सहभाग वाढविणे याकरिता देशांतर्गत केंद्र शासनाच्या वतीने १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत देशात स्वच्छ सर्वेक्षण’ सुरु झाले आहे.
स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड शहर अव्वल होण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता शहरातील नागरिकांनी आपल्या पिंपरी चिंचवडसाठी ऑनलाइन सकारात्मक प्रतिक्रिया देण्याची महत्त्वाची भूमिका आहे जेणेकरून शहराला जास्तीत जास्त गुण मिळू शकतील. नागरिकांना कंपोस्टींग, स्वच्छता ऍप, स्वच्छतागृह, महापालिकेची स्वच्छता विषयक सेवा, सेप्टीक टँक याबाबत कोणतेही ४ प्रश्न नागरिकांना विचारले जातात.
स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक खालीलपैकी कोणत्याही एका पध्दतीचे वापर करता येतो-
-
आपल्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरुन स्वच्छ सर्वेक्षण सिटीझन फीडबॅक साईटवर जावुन
लिंक – https://ss-cf.sbmurban.org/#/feedback किंवा
-
प्ले स्टोअर मधुन स्वच्छ सर्वेक्षण २०२२ वोट फॉर युवर सिटी ऍप डाऊनलोड करुन –
लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.ss2021vfc किंवा
-
प्ले स्टोअर मधुन स्वच्छता महुआ ऍप डाउन लोड करुन त्यामधील TAKE THE SURVEY ला क्लीक करुन
-
1ts.io/dZ0zE9L लिंक क्लीक करुन किंवा
-
सोबत जोडलेला क्युआर कोड स्कॅन करुन स्वच्छ सर्वेक्षणाविषयी आपले मत देवु शकता
नागरिकांना स्वच्छतेबाबत कोणतेही ४ विचारलेल्या प्रश्नांची योग्य सकारात्मक उत्तरे/ अभिप्राय देवुन आपले पिंपरी चिंचवड शहर नंबर १ बनविण्याचे आवाहन करणेत येत आहे.
आपले राज्य- महाराष्ट्र, जिल्हा -पुणे, शहर – पिंपरी चिंचवड शहर, त्यानंतर तुमचे वय, तुम्ही शहराचे रहिवाशी आहात का, तुमचे लिंग विचारले जाते इ. प्रश्नांची उत्तरे झाल्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येतो. ओटीपी टाकल्यानंतर आपले मत सर्वेक्षणामध्ये नोंदिवले जाते. नागरिकांनी आपले अभिप्राय/मत देऊन स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी व्हावे व आपले पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.