शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१५ मार्च) :- भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माळी समाजाचा सोळावा वधू, वर परिचय मेळावा रविवार दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास वधू , वर व पालकांना मोफत प्रवेश आहे अशी माहिती मेळावा प्रमुख शामराव गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
या मेळाव्यात सहभाग घेण्यास इच्छुक असणा-या वधू, वर किंवा पालकांनी संस्थेचे नोंदणी कार्यालय श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, महेशदादा स्पोर्टस् फाऊंडेशन, महादेव मंदिराजवळ लोंढे आळी, भोसरी पुणे – ३९ येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष शांताराम ताम्हाणे व उपाध्यक्ष संतोष लोंढे यांनी केले आहे.
रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्घाटन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे. नोंदणी केलेल्या वधू, वरांनी आपल्या पालकांसमवेत उपस्थित रहावे. नोंदणीसाठी संपुर्ण बायोडाटा, जन्मपत्रिका झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे.