शबनम न्यूज पिंपरी चिंचवड
सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे या दहावीच्या परीक्षेला विद्यार्थी पूर्ण तयारीने आपली परीक्षा देत असताना त्यांच्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छा पिंपरी-चिंचवड शहरातील माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे व माजी नगरसेविका स्वीनल कपिल म्हेत्रे तसेच महादेव कवितके भाजप मंडळ अध्यक्ष निगडी चिखली यांच्या वतीने देण्यात आल्या या दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना तोंड गोड करण्याची जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीला जपत दहावीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
दहावीचे विद्यार्थी हे आपले देशाचे भवितव्य घडविणारे भविष्यकाळातील जबाबदार नागरिक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आपण शुभेच्छा देणे अनिवार्य आहे कोणत्याही परीक्षेला जाताना तोंड गोड करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ही भारतीय संस्कृती जपतच या दहावीच्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक तसेच दहावी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते