शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ मार्च ) :- राष्ट्रवादीचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष तसेच संकल्प सोशल फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष बापु दिनकर कातळे यांच्या वतीने आधार कार्ड मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर आधार कार्ड मेळावा बापु दिनकर कातळे यांचे जनसंपर्क कार्यालय, बीआरटी बस स्टॉप मुकाई चौक, किवळे गाव येथे मंगळवार दिनांक १५ मार्च २०२२ पासून आयोजित करण्यात आला आहे.
तसेच या मेळाव्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळत आहे. तरी या आधार कार्ड मेळाव्याचे लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावे, असे आवाहन यावेळी बापु कातळे यांनी केले आहे.
Advertisement
या मेळाव्यात १ ते ५ वयोगटातील मुला- मुलींचे नवीन आधार कार्ड मेळावा तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून दिले जात आहे, अशी माहिती बापु कातळे यांनी दिली आहे.