वृत्तसंस्था
शबनम न्यूज : मुंबई (दि.१६ मार्च ) :- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावत कोणताही दिलासा दिलेला नाही. मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने दरेकरांची ही याचिका फेटाळून लावली आहे.
प्रवीण दरेकर हे मजूर नसतानाही त्यांनी मजूर असल्याचं दाखवत मुंबै बँक निवडणूक लढवली. त्यावरुन एमआरआय मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणात कठोर कारवाई होऊ नये आणि दिलासा मिळावा यासाठी दरेकर यांनी उच्च न्यायालयाच याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. असं असलं तरी जे योग्य कोर्ट आहे तिथे दरेकर दाद मागू शकतात, असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय.