शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मोहन नगर परिसरातील जलतरण तलाव बंद स्थितीत आहे सदरचे जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी या परिसरातील माजी नगरसेविका मीनल यादव यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की मागील २-३ वर्षांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे मोहननगर येथील जलतरण तलाव बंद आहे .तरी आता करोनाचे संकट दूर झाले तसेच वाढत्या उन्हाळ्यामुळे मुळे नागरिकांकडून हा तलाव सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे या तलावाची डागडुजी करून हा तलाव सुरू करण्यात यावा.