शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२२ मार्च ) :- रविवार दिनांक 20 मार्च 2022 रोजी “JAPAN KARATE DO NOBUKAWA-HA SHITO-RYU-KAI INDIA” या जापनीज पद्धतीच्या कराटे प्रशिक्षण संस्थेच्या पिंपळे गुरव शाखेच्या वतीने कराटे प्रशिक्षणार्थींसाठी “क्यु अँड डॅन” या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेमध्ये 50 हून अधिक कराटे प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. यामध्ये सारण्या मुनीश्वरण, कणक वीर, ईशान डे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना “श्यान डॅन हो ब्लॅक बेल्ट” आणि प्रमाणपत्र प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहीलेले इंजि. देवेंद्र तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रशिक्षक नरेश शर्मा यांच्यावतीने पिंपळे गुरव येथे या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
previous post