शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बाहय जाहिरात धोरण २०२२ तयार करण्यात आले आहे. शहरातील दृश्य अवकाश सौंदर्यात व रस्ता सुरक्षा हमीचा विचार होणे अत्यावश्यक असून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २४४ व २४५ अंतर्गत सदर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महापालिका आयुक्त् राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहिरात नियामक समिती (ARC) गठीत करण्यात आलेली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त (परवाना विभाग) निलेश देशमुख यांनी दिली आहे.
सदर जाहिरात नियामक समितीचे अध्यक्ष हे मनपा आयुक्त राजेश पाटील असतील. उपाध्यक्ष – अति.आयुक्त (आकाशचिन्ह व परवाना), तर, मुख्य लेखा परिक्षक, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, स्थापत्य विभाग प्रमुख, सह शहर अभियंता( बीआरटीएस), सह संचालक नगररचना (पिं.चिं.मनपा), माहिती व तत्रंज्ञान विभाग प्रमुख, भुमि जिंदगी विभाग प्रमुख, उदयान विभाग प्रमुख, वाहतुक उपआयुक्त, कला संस्था प्रतिनिधी हे सदस्य तसेच आकाशचिंन्ह व परवाना विभाग प्रमुख हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.