शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२३ मार्च ) :- धर्म ऐक्य घडवणारा एक धागा अर्वाचिन साहित्यात, संत परंपरेत सापडतो तो म्हणजे वारकरी संप्रदाय. महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि भक्तिमय संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आज पार्थ अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने विठ्ठल रूक्मीणी मंदिर वरील आळी दापोडी येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
श्री.सोपानराव भाडाळे, श्री.एकनाथ बहिरट,श्री.पांडुरंग काटे श्री यशवंत बोधे,श्री.माणिक काळभोर,श्री.प्रल्हाद काटे,श्री.सुरेश काटे,श्री.दत्तात्रेय जाधव, श्री.सुरेशभाऊ किंडरे,श्रीमती.विजया कणसे,श्री.बाबा लोखंडे,सौ.सुनिता बोत्रे,सौ.कविता कणसे,सौ.सावित्री मोरे,श्री.चंद्रकांत सोनवणे रवींद्र बाईत श्री.ज्ञानेश्वर बोधे,श्री.अजय जाधव,श्री.गणेश कांबळे,सौ.भामाबाई काटे ,श्रीमती लक्ष्मी जाधव, श्रीमती.मालती श्री.सोपानराव सुतार, सौ.चंद्रभागा भाडळे यांना सन्मानचिन्ह व उपरणे देऊन आयोजक कार्यक्षम माजी नगरसेवक राजाभाऊ बनसोडे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्राजक्ताताई वाघेश कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी स्वीकृत नगरसेवक संजय कणसे,युवा अधिकारी निलेश हाके,प्रभाग अध्यक्ष फमिदा शेख,अॅलेक्स दास,नरेश सुतार,जाफर शेख,सिद्राम म्हेत्रे,तानाजी डोईफोडे,दिलराज आण्णा,शंकर गायकवाड,निशांत कामठे,आकाश बोराडे,सोमनाथ कामठे,सनी वाघमारे,सुशांत वंजारी,अजय शिंदे,अमित संकनुर, अमन नाटेकर,मनोज गुंठे,आशिष जगताप,अंकुश वाघमारे,अमन संकनुर,सागर आल्लम,मिलिंद संकनुर उपस्थित होते.