शबनम न्यूज : पुणे (दि.२३ मार्च ) :- आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची गुपितं ज्या मोडी लिपीमध्ये दडली आहेत, जी भाषा शिवरायांच्या पराक्रमाची वारसा अन स्वराज्याच्या रोमहर्षक इतिहासाची वर्णनं सांगते ती मोडी लिपी, आपली भाषा कालपरत्वे अडगळीला पडते की काय असं वाटत असतानाच, श्रुती गणेश गावडे ही युवती मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहे.
अनेक स्तुत्य उपक्रम राबविल्यानंतर यंदा मोडी लिपीच्या माध्यमातून शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यासाठी श्रुती आपल्या कोथरुडमध्ये नॉर्थ डहाणूकर कॉलनी, तेजस नगर येथे शिवाजी महाराजांची भव्य अशी 1200 चौरस फुटी रांगोळी मोडी लिपीमध्ये लिहून साकारली आहे, त्यामध्ये तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा (111111) वेळा जाणता राजा या शब्दाचा वापर केला जाणार आहे. आपल्या हिंदुराष्ट्रात पहिल्यांदाच असा उपक्रम सादर होत असून, शिवरायांना मानवंदना देण्यासाठी व ही रांगोळी बघण्यासाठी अनेक नागरिक जमले होते. या उपक्रमाचे आयोजन सौ. हर्षाली दिनेश माथवड यांनी केले होते.