शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२४ मार्च ) :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची विद्यानगर येथे शिवसेनाच्या वतीने तिथिप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. कोरोना काळात सफाई कामगार, पोलिस कर्मचारी व डाँक्टर यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सम्मान करण्यात आला व तसेच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आले.
त्या प्रसंगी शिवसेना माजी नगरसेवक रामभाऊ पात्रे,विभाग प्रमुख सय्यद पटेल, उपविभागप्रमुख अंकुश पात्रे, शाखा प्रमुख अरुण पात्रे, प्रितम तेलंग, गंगाधर काळे, भागवत शितोळे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, दिलीप पाटिल,मनसे विभागप्रमुख दत्ता देवतरस, भाजपचे अमित गोरखे व चिंटु पाटील, सचिन सकाटे यांच्या हस्ते महाराज यांची आरती घेण्यात आली.
Advertisement