शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२४ मार्च ) :- भारतीय सिनेमा सृष्टीतील 60 व 70 च्या दशकातील लोकप्रिय नृत्यांगना अभिनेत्री हेलन यांच्या गाण्याची मैफल घेऊन आले आहेत, गोल्डन हिट्स ऑफ हेलन, आलाप एंटरटेनमेंट आणि 360 डिग्री प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येत्या शनिवारी 26 मार्च रोजी रामकृष्ण मोरे सभागृह येथे रात्री नऊ वाजता सादर होणार आहे.
आपल्या डान्स नृत्याने तसेच सुमधूर व थिरकणाऱ्या संगीतमय गाण्यांने सर्वांनाच वेड लावणाऱ्या हेलन या अभिनेत्रीच्या गाण्यांची मैफल या कार्यक्रमात सादर होणार आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कोमल कृष्णा, सुप्रसिद्ध गायिका ऋचा बोंद्रे, सुप्रसिद्ध गायक रफी हबीब, व सुप्रसिद्ध गायक प्रशांत साळवी हे या गाण्यांना सादर करणार आहेत, तर संगीत जगतात नावाजलेले असे संगीतकार या कार्यक्रमात गाण्यांना संगीत देणार असून हा संगीतमय कार्यक्रम मजेदार व संगीतमय तसेच उत्साहवर्धक कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध डीजे बंड्या करणार असून या कार्यक्रमाचे आयोजक – सुषमा बोऱ्हाडे आणि प्रशांत साळवी प्रायोजक -: बिग Fm 95, दिलीप सोनिगरा jewellers, चंपालाल गुलाबचंद वर्मा jewellers, आरंभ social फौंडेशन , M – TEK हे व्यवसायिक असणार आहेत.
शनिवार रात्री 9 वा, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ” गोल्डन हिट्स ऑफ हेलन” हा संगीत आणि नृत्यचा अनोखा असा संगम असलेल्या ह्या कार्यक्रमात जवळ जवळ 60% सोंग्स पंचमदा यांचीआहेत, 25% सोंग्स कल्याणजी- आनंदजी यांची 10% लक्ष्मीकांत – प्यारेलाल, 5% सोंग्स ओ पी नय्यर यांची आहेत, या सर्वांनी हेलन यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं मध्ये ब्रास आणि रिदम यांचा खूप कौशल्याने वापर केला आहे, या कार्यकामातील सर्व 23 गाणी पर्वणी आहे, या कार्यक्रमाची तिकेट्स बुकिंग Book my show, Phone Booking , आणि थेटर वर उपलब्ध आहेत.
सदर कार्यक्रमाचा संपूर्ण पिंपरी-चिंचवडकर यांनी लाभ घ्यावा व सुमधुर गाण्यांचा तसेच हेलन यांचे चाहते यांचेसाठी या गाण्यांची मेजवानी असल्याने या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाची बुकिंग आपण फोनवर सुद्धा करू शकतो. त्याकरिता प्रशांत साळवी 99 22 42 08 29 व सुषमा बो-हाडे 99 60 75 66 66 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.