शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२४ मार्च ) :- २३ मार्च बलिदान दिवस म्हणून आपण सर्व भारतीय साजरा करत असतो. महान स्वातंत्र्य वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज राजवटीत या दिवशी फाशी देण्यात आली होती, यानिमित्ताने या थोर क्रांतिकारकांना नमन करुन आपण अभिवादन करत असतो. सर्व देश हा बलिदान दिन साजरा करत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य अनिकेत दादा काटे यांच्या वतीने ही या थोर क्रांतिकारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच यावेळी या थोर क्रांतिकारकांचे स्मरण करून त्यांनी आपल्या देशासाठी दिलेल्या बलिदानाबद्दलच्या गाथा थोर-मोठ्यांना सांगण्यात आल्या जेणेकरून आपली येणारी पिढीला या थोर क्रांतिकारकांची ओळख होईल.
या कार्यक्रमाचे आयोजन अनिकेत दादा काटे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने दापोडी परिसरात करण्यात आले. यावेळी परिसरातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व अनिकेत दादा काटे यांचे मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.