शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२४ मार्च ) :- पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी महाराष्ट्राचे युवा नेते पार्थ पवार यांची देवगिरी येथे भेट घेतली. पार्थ यांनी इम्रान शेख यांच्या कडून अपूर्ण काम असताना मत मिळवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले उदघाट्न आणि शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या निषेध मोर्चा याचा आढावा घेतला . शहर अध्यक्ष यांचे कौतुक केले आणि ‘अभिरुप सभा’ या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद याबद्दल मुख्य समन्वयक योगेश बहल आणि नगरसेवक राहुल भोसले यांचे कौतुक केले. पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसने किल्ले सिहंगड येथे केलेल्या स्वछता अभियानाचे कौतुक केले आणि लवकरच पिंपरी चिंचवडच्या युवकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.
यावेळी पार्थदादा पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी आयुष दिलीप निंबारकर यांची निवड केली गेल्याचे नियुक्तीपत्र युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या वतीने दिले.यावेळी युवक उपाध्यक्ष दिनेश पटेल, विनय क्षीरसागर,अभिषेक ओव्हाळ उपस्थित होते.