शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.२४ मार्च ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील जाधववाडी परिसरातील उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गखोल्या कमी प्रमाणात असल्याने शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना मोठ्या अडचणी निर्माण होत असताना, या शाळेतील शिक्षक व पालकांनी या भागातील माजी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव यांची भेट घेतली व समस्या सांगितल्या. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जनसेवक संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला व या शाळेतील काही शिक्षक व पालक यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली व समस्या समजावून सांगितली. तसेच या उर्दू शाळेत लवकरात लवकर वर्गखोली उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आयुक्त राजेश पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी संतोष जाधव यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जमीर शेख व शफी चौधरी उपस्थित होते.
Advertisement