शबनम न्यूज : पुणे (दि.२६ मार्च) :- दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे बालगंधर्व चौक येथे आज लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दुर्गाताई भोर यांनी केले. प्रशासन महिलांवर होणाऱ्या अत्याचाराकडे गांभीर्याने पाहत नसून शहरात बिहार प्रमाणे गुलाबी गॅंग निर्मिती करायची गरज निर्माण झाली आहे, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सरचिटणीस अभय भोर यांनी विचार व्यक्त केले.
आज शहरामध्ये 70 टक्के रखवालदार परप्रांतीय असून या रखवालदाराची कोणत्याही प्रकारे चौकशी केली जात नाही. अथवा पोलिसांमध्ये नोंद केली जात नाही, अशा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अनेक शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये, मॉल, शोरूम, एटीएम सेंटर या ठिकाणी ज्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत त्यांची कोणत्याही प्रकारे पोलिसांमध्ये नोंद करत नाहीत. हे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून फक्त शाळे बाहेरच नाही तर आसपासच्या परिसरामध्ये जनजागृती घडविणे आवश्यक असून निर्भय यांना निर्भय वातावरण करुन देणे आवश्यक आहे. आरोपींना फक्त चौकशी न करता कठोर शासन झाल्यास याचा मोठा परिणाम होईल, आधी घडलेल्या घटनांची लवकरात लवकर चौकशी करून शक्ती कायद्याअंतर्गत पीडितांना न्याय लवकरात लवकर मिळवून न दिल्यास दुर्गा ब्रिगेड वतीने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी उग्र आंदोलन उभारण्यात येतील असे सांगण्यात आले.
याप्रसंगी मीनाक्षी गिरी, सुनिता कलोला, सौ पुष्पा मंदारे, मीनाक्षी सूर्यवंशी, दुर्गा वरणकर, नेहा गुरव ,उर्मिला , ललिता मदगे, मनीषा विभुते, गीता शिंदे, सुनिता जाधव, सुनिता भोर, कविता राक्षे, कल्पना पालवी ,नीता स्वामी, श्रद्धा धर्माधिकारी मोठ्या संख्येने महिला आणि हनुमंतराव तिकुडवे दीपक परदेशी दिपक घन चरण सिंग कश्यप सुनील मेदनकर जश गिंद्रा वर्ग स्वप्निल देवकरे उपस्थित होते.