शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२७ मार्च) : – भारतीय सिनेमा सृष्टीतील साठ-सत्तरच्या दशकातील लोकप्रिय नृत्यांगना अभिनेत्री हेलन यांच्या गाण्याची मैफल “गोल्डन हिट्स ऑफ हेलन” आलाप एंटरटेनमेंट आणि 360 डिग्री प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शनिवारी 26 मार्च रोजी पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कोमल कृष्णा, सुप्रसिद्ध गायिका रिचा बोद्रे, सुप्रसिद्ध गायक रफी हबीब व सुप्रसिद्ध गायक प्रशांत साळवी यांनी अभिनेत्री हेलन यांच्यावरील चित्रीत सुमधुर असे अनेक गाणे सादर केले. तर संगीत जगतात नावाजलेले असे संगीतकार या कार्यक्रमात या गाण्यांना संगीत देऊन कार्यक्रम हा संगीतमय व उत्साहवर्धक करण्यात यशस्वी झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आर जे बंड्या यांनी आपल्या आकर्षक निवेदनाद्वारे केले.
अभिनेत्री हेलन यांच्या जीवनाचे अनेक असे प्रसंग या कार्यक्रमाद्वारे आर जे बंड्या यांनी आपल्या निवेदनात प्रेक्षकांना सांगितले 1938 सालात जन्मलेल्या हेलन यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून नृत्य जगतात पदार्पण करीत सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली त्यांनी अनेक चित्रपटात सुमधुर नृत्यमय संगीताच्या तालावर मनमोहक नृत्य सादर करत सहा दशक चाहत्यांच्या मनावर राज्य केले.
अभिनेत्री हेलन यांच्या गाण्यांची मैफली चा कार्यक्रमआलाप एंटरटेनमेंट चे प्रशांत साळवी व 360 डिग्री प्रॉडक्शनच्या सुषमा बोऱ्हाडे यांनी प्रेक्षकांसाठी आयोजित केली व हि संगीतमय मैफल प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानीच ठरली.
मागील दोन वर्षापासून कोरोना काळात थिएटर्स सर्व बंद होते त्याचप्रमाणे असे मोठे कार्यक्रम मागील दोन वर्षापासून झाले नाही प्रेक्षकांना मोठ्या कालखंडानंतर अशा एका संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेता आला या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला रामकृष्ण मोरे सभागृह अक्षरशः प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळाले हेलन यांचे चाहते व संगीतावर प्रेम करणाऱ्या अनेक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम हाउसफुल केला.
हा संगीतमय कार्यक्रम प्रेक्षकांना एक आल्हाददायक असा अनुभव देऊन गेला सुरुवातीपासूनच कार्यक्रमाने आपली पकड निर्माण केली व हा कार्यक्रम शेवटपर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाला. अभिनेत्री हेलन यांच्यावर चित्रित प्रत्येक गाणे हे उत्साहवर्धक असे होते या गाण्यांना प्रसिद्ध संगीतकार विवेक परांजपे, मिहिर भडकमकर ,सईद खान, विशाल तेलकर, विजय मूर्ती, बाबा खान ,असिफ खान, दीपक काळे, अभिजीत बडे, सुनील सवाई, केदार मोरे, नितीन शिंदे व सागर चव्हाण यांनी संगीत देत कार्यक्रमाची उंची वाढविली.
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नगरसेवक तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम प्रशांत साळवी व सुषमा बोऱ्हाडे यांनी आयोजित केला तर या कार्यक्रमाचे प्रायोजक आरंभ सोशल फाउंडेशन तसेच दिलीप सोनिगरा ज्वेलर्स ,चंपालाल गुलाबचंद वर्मा, 95 बिग एफएम रेडिओ व एमटेक हे व्यावसायिक होते.
गोल्डन हिट्स ऑफ हेलन हा संगीतमय नृत्य याचा अनोखा संगम असलेल्या या कार्यक्रमात जवळजवळ 60 टक्के गाणी हे पंचमदा अर्थातच आर डी बर्मन यांची होती तर 25 टक्के गाणी ही कल्याणजी-आनंदजी यांची 10 टक्के लक्ष्मीकांत-प्यारेलाल व 05 टक्के गाणी ही ओ पी नय्यर यांची होती या सर्वांनी हेलन यांच्यावर चित्रित केलेल्या गाण्यांमध्ये ब्रास आणि रिदम यांचा खूप कौशल्याने वापर केला या कार्यक्रमात एकूण 23 गाण्याची पर्वणी प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आली.या कार्यक्रमात ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां , मेरा नाम चिन चिन चु बाबा चिन चिन चू, रात चांदनी मैं और तू हेलो मिस्टर हाउ डू यू डू , यह मेरा दिल प्यार का दीवाना, हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैं. अशी अनेक गाणी प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आली
या संगीतमय कार्यक्रमात प्रचंड अशी उपस्थिती दर्शविल्याने या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत साळवी व सुषमा बोऱ्हाडे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले व असाच कार्यक्रम आपण लवकरच पुण्यामध्ये सादर करणार असल्याचेही सांगितले.