शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कै.नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी येथील पशुवैद्यकीय विभागामार्फत पाळीव प्राण्यांवर उपचारासाठी सुरु असलेला बाह्यरुग्ण विभाग नेहरुनगर येथील प्राणी सुश्रुषा केंद्र (डॉग पाउ॑ड ) गवळी माथा रोड, अनुकुल कंपनी समोर दि. ०१/०४/२०२२ पासुन स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे यांनी दिली. तरी शहरातील नागरिकांनी याबाबतची नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन देखील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे यांनी केले.