शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२९ मार्च) :- आज दिनांक 29 मार्च 2022 रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेत वय वर्ष 12 ते 14 वर्षाच्या आतील 122 विद्यार्थ्यांना corbevax लस देण्यात आली लसीकरण कॅम्पसाठी विद्यार्थी व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला , तीन तासात 122 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले,तसेच थेरगाव रुग्णालय मार्फत इयत्ता सातवी ते नववीतील बारा ते चौदा वर्षाच्या दरम्यान वय असलेल्या विद्यार्थ्यांना आज रोजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी ,सिस्टर जया हिवराळे, डेटा एंट्री ऑपरेटर प्रशांत बुरसे, तसेच हेल्पर अमित बंडवाल यांनी व्यवस्थित सहकार्य करून माध्यमिक विद्यालय थेरगाव या ठिकाणी लसीकरण कॅम्प यशस्वी केला.
नवीन थेरगाव रुग्णालयातील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर अभय दादेवार यांच्या वतीने हा लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पसाठी शिंदे मॅडम तसेच ज्येष्ठ सिस्टर मेरगेवार यांचे सहकार्य लाभले या लसीकरण मोहिमेच्या वेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्व पालकांनी यावेळी माध्यमिक विद्यालय थेरगाव तसेच थेरगाव रुग्णालय यांचे आभार व्यक्त केले. पालकांच्या संमतीने 122 विद्यार्थ्यांना corbevax ही लस देण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर कदम, पर्यवेक्षिका श्रीमती चौगुले ए एस तसेच ज्येष्ठ शिक्षक कृष्णकांत टकले यांनी यशस्वी केले.