शबनम न्यूज : पुणे (दि.३० मार्च) :- आज ३० मार्च रोजी ससून हॉस्पिटलमध्ये हिकमत मेडिकल फाऊंडेशन आणि उम्मत सामाजिक संस्था यांच्यावतीने स्वर्गीय अमन हसन रंगरेज यांच्या स्मरणार्थ १०० युरीन कलेक्टर आणि २० खुर्ची हॉस्पिटलमध्ये भेट देण्यात आले.
सदर कार्यक्रमास पुणे शहराचे जेष्ठ मुस्लिम धर्मगुरू गुलाम अहमद खान, उम्मत सामाजिक संस्थाचे अध्यक्ष जावेद खान , डॉ . किरण जाधव, डॉ . नरेश झंजाड, डॉ . शुभम देशमुख , बाबाजान दर्गाहचे विश्वस्त सलिममौला पटेल , हिकमत मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष हसन रंगरेज , शेरु रंगरेज , तौसिफ कुरेशी , जाफरभाई टिंगली , दावल शेख आदि उपस्थित होते .
Advertisement