शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३० मार्च) :- दिनांक ०३ एप्रिल पासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. जगभरातील मुस्लिम उपवासाचा महिना म्हणून पाळतात प्रार्थना, प्रतिबिंब आणि समुदाय. रमजानचे वार्षिक पाळणे इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक मानले जाते आणि चंद्रकोर चंद्राच्या एका दिसण्यापासून दुसऱ्यापर्यंत, एकोणतीस ते तीस दिवस टिकते. मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.ईद उलल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर्यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात.
पिंपरी चिंचवड शहरात मुस्लिम समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व ८५ च्या जवळपास मस्जिद आहेत.तरी सर्व मस्जिदच्या बाजूची साफसफाई नियमित करण्यात यावी व मस्जिद च्या बाजूचे पथदिवे दुरुस्त करण्यात यावे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी. पाणी हे वेळेवर व मुबलक प्रमाणात सोडवण्यात यावे. मुस्लिम बांधवांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी हि आपणास नम्र विनंती.
या आशयाचे निवेदन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM ) पक्ष यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.