३१/३२/३३/ व ४० या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ मार्च) :- आगामी होणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर( जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने प्रभाग स्तरावरील कार्यकर्ता संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या उपस्थितीत व चिंचवड विधानसभा मतदार संघाचे नेते मा. विरोधी पक्षनेते मा. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरातील राष्ट्रवादीच्या इतर सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दि. 30 मार्च रोजी प्रभाग क्रमांक ३१/३२/३३/ व ४० या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा व प्रभाग संपर्क अभियान इंदू लॅान्स काळेवाडी या ठिकाणी आयोजित केला होता.
यावेळी अध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष , सुनिल गव्हाणे, नगरसेवक मयूर कलाटे, संतोष कोकणे, विनोद नढे, मा. नगरसेवक खंडूशेठ कोकणे, कैलासभाऊ थोपटे, मच्छिंद्र तापकीर, राजेंद्र साळुंके, स्वीकृत माजी प्रभाग सदस्य सागर कोकणे, नवणाथ नढे, माजी नगरसेविका सौ. उषा माई काळे, सौ. शितलताई नाना काटे, माजी नगरसेविका सौ मायाताई बारणे, मा. नगरसेविका सौ. अनिताताई तापकीर, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आजी माजी विविध सेलचे पदाधिकारी , इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.