शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.३१ मार्च) :- शास्तीकर वगळून मूळ मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ द्यावी अशी मागणी दिनेश यादव व संतोष मोरे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत राबवण्यात आलेल्या योजनेची मुदत ३१,३,२०२२ पर्यंत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना काळामुळे सर्व नागरिकांच्या आर्थिक परिस्थिती ही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वरील योजनेचा फायदा मिळण्यासाठी ११ एप्रिल पर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी अनेक उद्योग व्यवसाय कोरोनामुळे अडचणीत आहेत. सर्वसामान्य जनता बेरोजगारीचा सामना करत आहे, अनेक उद्योजक कोरोनामुळे मृत्यूदेखील पावलेत तरी सर्व गोष्टीचा विचार करून आपण शास्तीकर वगळून मिळकत कर स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी माजी स्वीकृत सदस्य संतोष मोरे व माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.