शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०१ एप्रिल) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना – पिंपरी चिंचवड शहर सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांची बुधवार दिनांक 30/03/2022 रोजी महत्वाची बैठक आयोजित केली होती. पिंपरी विधानसभा बैठक मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय, चिंचवड विधानसभा बैठक हेमंत डांगे यांचे जनसंपर्क कार्यालय, चिंचवड तसेच भोसरी विधानसभा बैठक विशाल मानकरी यांचे निवासस्थान, रामेश्वर चौक, रुपीनगर या ठिकाणी गणेश (आप्पा) सातपुते* – (प्रभारी पिं. चिं. शहर), किशोर (भाऊ) शिंदे – प्रभारी पिं. चिं. शहर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त अतिशय जल्लोषात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच ज्या नागरिकांना राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी यायचे आहे अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय या ठिकाणाहून बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शनिवार 02/04/2022 रोजी दुपारी 12.00 वाजता बस मुंबई च्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे . तरी सर्व नागरिकांनी व महाराष्ट्र सैनिक यांनी हिंदूजननायक आदरणीय राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे.