शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०३ एप्रिल) :- युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री मा.आदित्यजी ठाकरे व युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून भोसरी विधानसभे मध्ये साने चौवकात केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत रविवार, दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.
शिवसेना जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी शहर संघटक सचिन सानप , अनिल सोमवंशी , राहुल भोसले यांनी मनोगत वक्त केले यावेळी युवासैनिकानीं इंधन दरवाढ लादणाऱ्या भाजप सरकारचे प्रतिकात्मक अभिनंदन करून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करावा व इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी जोरदार मागणी थाळी वाजवत केली.
या आंदोलनाचे नियोजन युवासेना शहर प्रमुख अजिंक्य उबाळे , युवासेना भोसरी विधानसभा अधिकारी अमित शिंदे , विधानसभा समन्वयक स्वप्नील शिरसाठ , सागर रहाणे, प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोषी , उपविधानसभा अधिकारी सुनील समगीर,सुरज दाभाडे , अभिजित गिरी , अभिषेक सुरवसे , यांनी केले , यावेळी विभाग प्रमुख सतीश दिसले, नितीन बोनडे, संजय गाढवे , महिला आघाडीच्या साधना काशीद , आशाताई भालेकर , जनाबाई गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना, शिवसेना , महिला आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.