शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ एप्रिल) :- माजी स्विकृत प्रभागसदस्य अनिकेत काटे व महामाया प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने क्रेडिट रिकव्हरी फायनान्स कॉलिंग सेन्टर मध्ये टेलिकॉलिग पदाकरीता 10 सुशिक्षित युवक-युवतींना कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त करून दिल्याबद्दल अंकिता साळवे (मॅनेजिंग डायरेक्टर क्रेडिट रिकव्हरी फायनान्स कॉलिंग कंपनी ) यांचा सत्कार तसेच 10 युवक युवतींना अपोईन्टमेंट लेटरचे वाटप त्याचप्रमाणे समीक्षा महिला बचत गट उद्घाटन समारंभ रविवार दि.०३ रोजी दुपारी 3.00 वाजता संपन्न झाला.यावेळी महामाया प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, शंकरभाऊ जम, आशा वर्कर्स, वर्षाताई काळे,राधिकताई अडागळे, जन्नतताई सय्यद , बापू अडागळे , सोपाननाना काटे, प्रमिलाताई घुमे, वैशाली सागळे,रागिणी कांबळे,कोमल ताई जाधव, साराताई ह्या मान्यवर उपस्थित होत्या. यावेळी अनिकेत काटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.