शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ एप्रिल) :- दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवून शांतता भंग करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विरोधात भारतीय दंड संहिता कलम १५३, १५३ अ , १५३ ब ,२९५ अ ,२९८ ,५००, ५०१ ,५०२ ,५०४ ,१२० ब ,३४ प्रमाणे गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे वतीने करण्यात आले.
पिंपरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक मा. भोजराज मिसाळ साहेब यांना निवेदन देण्यात आले, या प्रसंगी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष फय्याज शेख, पिंपरी चिंचवड शहर युवक उपाध्यक्ष मा. वसीम शेख, हिंदल-वली सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. मद्दसीर मुजावर उपस्थित होते.
सदर निवेदन ई-मेल द्वारे राज्य चे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना सुध्दा पाठवण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवार (दि-2)रोजी जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सरपणे राष्ट्रीय एकात्मतेला बाधक व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे बेछूट ,बेताल विशिष्ठ धर्मियांच्या भावना दुखवण्याचा उद्देशाने व दोन समाजात तेढ निर्माण करून दंगली घडवून दहशत माजवण्याच्या हेतूने हेतूतपुरस्सर आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे .यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा तात्काळ दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.