शबनम न्यूज : पुणे (दि.०७ एप्रिल) :- भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशातील 23 राज्यातील 150 वृत्तपत्रे आणि जगातील 30 देशांमधील 65 हून अधिक वृत्तांत यांच्या अध्यक्षीय संकलनाचे प्रदर्शन तसेच “देशोदेशी पानोपानी लता लता” या विशेषांकाचे प्रकाशन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या शुभहस्ते शुक्रवारी 8 एप्रिल रोजी स.11:30 वाजता बालगंधर्व कलादालन पुणे येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.उल्हास पवार असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर गाडगीळ असणार आहेत तर या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. गौरी दामले करणार आहेत. सदर कार्यक्रम कृष्णकुमार गोयल यांनी आयोजित केला असून, कार्यक्रमाचे संयोजक संवाद पुण्याचे अध्यक्ष सुनील महाजन करत आहेत तर संकल्पना व संकलन प्रवीण वाळिंबे संपादक स्वरप्रतिभा यांनी केले आहे. हे प्रदर्शन दिनांक 8,9 व 10 एप्रिल या दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात लतादीदी बाबत अनेक साहित्याचे संकलन पाहावयास मिळणार आहेत.