राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांची या प्रकरणाच्या चौकशीची मागणी
अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपोला बुधवारी आग लागली ही आग खरं लागली की लावण्यात आली असा संशयास्पद प्रश्न राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केला आहे भाजपच्या ठेकेदारांना तसेच या प्रकरणात भ्रष्टाचार करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वाचविण्यासाठी तर ही आग लावली नसावी ? असाही संशय राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट यांनी केला आहे तसेच या प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी अशीही मागणी कविता अल्हाट यांनी केली आहे.
मोशी कचरा डेपोला बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले . या आगीबाबत सर्वच स्तरावरून संशय व्यक्त होऊ लागला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनीही संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे.
मोशी येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. या कचरा डेपोला आतापर्यंतची सर्वांत मोठी आग बुधवारी लागली होती. महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी संशय व्यक्त करीत कचरा डेपो चे व्यवस्थापनासाठी महापालिका वतीने कोट्यवधी रुपये खर्च केले जातात , मोशी येथील कचरा डेपोतील ठेकेदारी पद्धत सुरू असलेली कामे हे भाजप नेत्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना देण्यात आली आहे. कोरोना काळात कामे न करता ठेकेदारांना कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली ,वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, कॅपिंग, औषध फवारणीसारखी करोडो रुपयांची कामे भाजपचे नेते यांनी आपल्या ठेकेदारांना देऊन मोठा भ्रष्टाचार केला यातील एकही काम पूर्ण झालेले नाही अशा ठेकेदारांना वाचविण्यासाठी तसेच मोशी कचरा डेपो च्या माध्यमातून कोट्यावधी रुपये दडपण्याचा प्रयत्न या आगी च्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप कविता आल्हाट यांनी केला आहे.
त्यामुळे ही आग भ्रष्टाचार लपविण्यासाठी लावण्यात आली होती की लागली होती, याची चौकशी व्हावी या करीता चौकशी समिती स्थापन करावी तसे न केल्यास महापालिकेसमोर राष्ट्रवादी वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही कविता आल्हाट यांनी दिला आहे. यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.