पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेने नाशिक फाटा येथे भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाण पुल गेल्या ८ वर्षा पूर्वी बांधला. या उड्डाण पुलावर पिंपळे गुरव येथून नाशिक फाटा येथे उतरणारा रॅम्प बांधण्यात आला होता याला अंदाजे १० कोटी रुपये खर्च झाला होता. मात्र वाहतुक विभागाचा अभिप्राय न घेतल्याने वाहतुक विभागाने हा चुकलेला रॅम्प गेली ८ वर्षे बंद ठेवला आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांचे पैसे पाण्यात गेले आहेत. या रॅम्प मुळे मुंबई पुणे मार्गावर नाशिक – फाटा येथील चौकात वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा रॅम्प पाडून सदर रस्ता सुरळीत करुन त्याचा खर्च संबंधित तत्कालीन अधिकारी व सल्लागार यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.