पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालय पुणेचे मुख्य कार्यकारी अभियंता मा.श्री. सचिन तालेवार साहेब यांची भेट घेऊन येणाऱ्या पावसाळ्यामध्ये औद्योगिक आस्थापनांना अखंडित वीज पुरवठा चालू रहावा यासाठी निवेदन दिले यावेळी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक प्रमोद राणे , सचिन आदक उपस्थित होते, तसेच महावितरण तर्फे अधीक्षक अभियंता श्री. राजदीप साहेब हेही उपस्थित होते, सदर निवेदन खालीलप्रमाणे.
दिनांक ११ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी भोसरी विभागामध्ये अर्धा ते पाउण तास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला होता, त्या वेळी महावितरणचे भोसरी विभागातील ( आकुर्डी व निगडी सोडून ) जवळपास १५ फिडर ट्रीप होऊन भोसरी एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होऊन वीज वितरण बंद पडले होते. पावसाळ्यामध्ये वादळ, वारा व पाऊस यामुळे महावितरणच्या वीज वितरण करणाऱ्या फिडरला वाढलेल्या झाडांच्या फांद्या लागून (touch) फिडर ट्रीप होऊन महावितरणची वीज वितरण व्यवस्था खंडित होऊन उद्योजकांचा वीज पुरवठा बंद होतो. हे आम्ही वेळोवेळी महावितरणच्या सन्मानीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो व त्या वेळेस महावितरण तर्फे तात्पुरती कारवाई करून २ ते ३ फिडरला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटल्या जातात. फिडर ट्रीप झाल्यावर कोणत्या ठिकाणी फिडरला झाडाची फांदी टच झाली आहे हे महावितरणच्या लाईनमनला पेट्रोलिंग करून शोधून काढण्यास २ ते ३ तास व झाडाची फांदी छाटण्यास अवजारे व मनुष्यबळ जमा करून साधारणपणे ४ ते ५ तास
( सर्व मिळून ६ ते ७ तास ) लागतात. वीज पुरवठा खंडित राहिल्यामुळे महावितरण व उद्योगक्षेत्राचे प्रचंड आर्थिक नुकसान होते.
भोसरी विभागामध्ये भोसरी, आकुर्डी व निगडी उपविभाग येतात व पिंपरी विभागामध्ये काही भाग ( यांचे कार्यकारी अभियंता वेगळे ) आहेत. असे सर्व मिळून भोसरी व पिंपरी कार्यकारी अभियंता क्षेत्रातील भोसरी मधील प्राधिकरण पेठ क्रमांक ७ व १० , पवना व मोरया
कॉप्लेक्स, जे, एस, टी ब्लॉक, शांतीनगर गुळवे वस्ती, आनंदनगर, भगत वस्ती, पिंपरीतील एफ २, एच ब्लॉक, चिंचवडमधील डी १,२,व ३ ब्लॉक, ताथवडे ,किवळे तसेच चिखलीतील मोरेवस्ती, पवारवस्ती, कुदळवाडी, शेलारवस्ती, सोनावणेवस्ती, तळवडे मधील त्रिवेणीनगर, सहयोगनगर, रुपीनगर, गणेशनगर, ज्योतीबानगर, मोशीतील बोराटेवस्ती, बारणेवस्ती, बोऱ्हाडेवस्ती, टोल नाका परिसर इत्यादि मध्ये ५५ ते ६० फिडर आहेत. या फिडरवर साधारणपणे सहा हजार उद्योजक व त्यांचेवर अवलंबून अनेक लहान उद्योग आहेत. वरील औद्योगिक परिसरातून महावितरणला वीज बिलाच्या रूपाने खूप मोठा महसूल मिळत आहे. अशा ५५ ते ६० फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी झाडाच्या फांद्या छाटल्या नसल्यामुळे व मनुष्यबळ कमी असल्याने काही ठिकाणी २ ते ३ दिवस वेळ लागतो व त्यामुळे महावितरण व उद्योजक यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होते.
एप्रिल २०२२ पासून प्रत्येक गुरुवारी नियोजन करून झाडांच्या फांद्या छाटून येणारा पावसाळा सुकर करणे व त्याच बरोबर CRIMING, फीडर पिलरचे आतील भाग बदलणे,
( उदा.HRC,फ्युज,वायर इ.) रोहीत्राचे मेंटेनन्स, OILची पातळी प्रमाणत ठेवणे, विविध प्रकारच्या व वेगवेगळ्या साईज असलेल्या केबल्स stock मध्ये ठेवणे, FOULT FINDING वाहनांची संख्या वाढविणे, केबल जॉईन करणारांची संख्या वाढविणे,
झाडांच्या फांद्या छाटल्यामुळे महावितरणाचा ७० टक्के वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल अशी विनंती आम्ही पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटने तर्फे करतो.
सदर निवेदन वाचल्यानंतर वरील विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर मा.मुख्य कार्यकारी अभियंता यांनी सांगितले कि नवीन DPR मध्ये २८ कोटी मंजूर झालेले असून ते मिळाल्यानंतर सदर ठिकाणची पाहणी करून रोहित्र व RMU नवीन बसविले जातील. ज्या ठिकाणी रोहित्र ओव्हर लोड झालेले असतील त्या ठिकाणी ज्यादा क्षमतेचे रोहित्र किंवा नवीन दुसरे रोहित्र बसविले जाईल. तसेच याच महिन्यात वीज वाहिन्यांना धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम केले जाईल. तसेच संबधित विभागातील महावितरण कर्मचाऱ्यांनाही सूचना देऊन आलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश देण्यात येतील.