२२ एप्रिल पासून अनुभवा 80s ची मजा २०२२ मध्ये
– अभिनेता सागर संत याचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
“दिल दिमाग और बत्ती” या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांचे संगीत असून यात विविध धाटणीची चार गाणी आहेत. गीतकार हृषीकेश गुप्ते यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहीत राऊत, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा कराडे यांचा आवाज लाभला आहे.
सा क्रिएशन्स ची पहिलीच निर्मिती असलेल्या “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असून छायांकन सलील सहस्त्रबुद्धे यांचे आहे. “दिल दिमाग और बत्ती” २२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.