शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड ( दि.११ एप्रिल ) :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध भागात ‘मोफत आरोग्य तपासणी’ शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. आज शिबिराचे आयोजन गांधीनगर पिंपरी येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी ‘सुपर 46’ या कार्यक्रमात दत्तक घेतलेल्या प्रभागात हा कार्यक्रम मोठ्या जोमाने पार पडला. यावेळी शंभराहून अधिक लोकांनी या मोफत आरोग्य शिबिरात सहभाग घेत या योजनेचा लाभ घेतला.यावेळी या शिबिरास आमदार अण्णा बनसोडे तसेच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा महापौर योगेश बहल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी आण्णा बनसोडे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या योजनेचा फायदा कष्टकरी गोर गरीब नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळत असून आत्ता पर्यंत भोसरी आणि पिंपरी विधानसभेत 39 जागी घेण्यात आले असून आता ही मोहित उर्वरीत शहरात अजून एक महिन्यापर्यंत असणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार आण्णा बनसोडे यांनी नागरिकांना केले तसेच नवनिर्वाचित युवक अध्यक्ष इम्रान शेख हे अतिशय चांगलं काम करत असून शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारधारेचा वारसा पुढे नेण्याचे काम करत असून त्यांना माझा सदैव पाठिंबा असेल असेही ते यावेळी म्हणाले.
जेष्ठ नेते मुख्य समन्वयक योगेश बहल म्हणाले की, या मोफत आरोग्य शिबीरात रक्तदाब, मधुमेह चाचणी, तसेच इतर आजारांवर निदान आणि उपचार केले जात आहेत,आरोग्य हीच खरी धनसंपदा असून नागरीकांनी सर्वप्रथम आपलं आरोग्य जपले पाहिजे असा सल्ला यावेळी बोलताना त्यांनी दिला तसेच युवक अध्यक्ष इम्रान शेख यांची निवड होऊन कमी कालावधी झाला आहे तरी या कामी कालावधीत युवक अध्यक्ष व त्यांच्या टीम ने खूप नेत्रदीपक कामगिरी केली असून येणाऱ्या काळात युवकांचे मजबूत संघटन बांधणी करून पक्ष मजबूत करण्यास ही टीम सक्षम असून अतिशय योग्य निवड पक्षश्रेष्ठींनी केली आहे व आमचा नेहमी पाठिंबा असेल असे योगेश बहल म्हणाले..
युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सचिव अमोल बेंद्रे यांचा वतीने करण्यात आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक पदाधिकारी निलेश लोंढे, प्रकाश गवई, वॉर्ड अध्यक्ष विजय शिंगाडे व युवा नेते नितुल पवार यांच्या सहकार्यातून करण्यात आले.याचे समन्वय विनय शिंदे आणि संदीप पाटील यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष प्रसन्न डांगे, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष आयुष निंबारकर, उपाध्यक्ष दिनेश पटेल, शहर सचिव ओम क्षीरसागर, शंकर पवार ,पियुष अंकुश, समाधान आचलखांब, धनराज चौधरी, अमोल कोळी,इरफानभाई शेख, मुज्जू मुजावर, चंद्रकांत बोचकूरे आणि युवक पदाधिकारी हे उपस्थित होते.