शबनम न्यूज : पुणे (दि.१२ एप्रिल) :- ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य १४ एप्रील रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटी ,हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ,गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट,महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन एंड रिसर्च सेंटर तसेच अवामी महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी होतील. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी होतील .
दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. दहा हजार विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेश प्रसारित केले जातात.दरवर्षी काढण्यात येणारी मोठी अभिवादन मिरवणूक यावेळी रद्द करण्यात आली आहे.