शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा फुले यांची 195 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष व नागरिकांनी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे , माळी संघाचे अध्यक्ष हनुमंत माळी , गणेश जांभूळकर , चेतन वाघमारे, श्रेयस मोहलकर,कविता खराडे ,मनीषा गतकळ, समिता गोरे आदी उपस्थित होते.
Advertisement