शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ एप्रिल) :- राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजु , कुणी समाजकारणाचा मुखवटा परिधान राजकारणात प्रवेश करू पाहतात तर कुणी आपला स्वार्थ साधण्यासाठी समाजकारणाचे राजकारण करतात . शितलताई मात्र याला अपवाद आहेत. असे प्रतिपादन माजी महापौर राहुल जाधव यांना शितल वर्णेकर यांनी घेतलेल्या नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले .
यावेळी राहुल जाधव म्हणाले , आपल्या प्रभागात वावरत असताना एका कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर त्या घरातील ज्येष्ठ लोकांचे कृपा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याची खुशहाली विचारत असताना त्यांना मोतिबिंदु झाल्याचे समजले , परंतु घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांच्या घरच्यांना हा खर्च पेलवणारा नव्हता ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या सारख्या अनेक गरजु लोकांसाठी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी पिंपरी चिंचवड मनपाचे माजी महापौर राहुल जाधव तसेच मा . शांताराम ( बाप्पू ) भालेकर ( मा . नगरसेवक पिं.चिं मनपा ) , अस्मिताताई भालेकर ( खजिनदार महिला मोर्चा पिं.चिं . शहर भाजपा ) , अरूण वाकुंजकर ( अध्यक्ष घारजाई ज्येष्ठ नागरिक संघ ) , एस.डी. ( तात्या ) भालेकर ( सचिव ज्ञानदिप उच्च मा . विद्यालय ) , अनिलशेठ भालेकर ( उद्योजक ) , पंढरीनाथ ( आप्पा ) गरूड ( उद्योजक ) , अकबर असुन हा सर्व उपक्रम मोफत आहे शेख ( उद्योजक ) , गजानन वाघमोडे ( उद्योजक ) , सुर्यकांत भसे ( प्राध्यापक ) सालोटगी सर तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेशशेठ भालेकर , रामदास कुटे , मोहन शेवाळे , दादा तळेकर , दादासाहेब सातपुते , बाळासाहेब काजळे , रवी शेतसंधी तसेच डॉ . शेखर राळेभात , डॉ . राहल वाघ , डॉ . संजय कुंभार , डॉ . योगेश पाटील , डॉ.संतोष टाटीया डॉ . बी . नाकाडे , डॉ . नितेश जैस्वाल , डॉ . स्वप्नील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते व सदर उपक्रम एच . वी . देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असुन या उपक्रमासाठी १४०० पेक्षा जास्त लोकांनी यासाठी नावनोंदणी केली. तसेच या उपक्रमाबाबत राहुलदादांनी शितलताईंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या .